मॅन्चेस्टर वृत्तसंस्था । वेस्ट इंडिजविरूध्दच्या एक दिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
विश्वचषकात ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारताचा आज विंडीजसोबत सामना होत आहे. आजचा सामना जिंकल्यास भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश होणार आहे. यामुळे हा सामना जिंकण्याचा टिम इंडियाचा प्रयत्न असणार आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जायबंदी झालेला भुवनेश्वर कुमार हा फिट झालेला असला तरी त्याच्या जागेवर येऊन गत सामन्यात दमदार कामगिरी करणार्या मोहंमद शमी याला आज पुन्हा खेळविण्यात येत आहे. तर विंडीजच्या संघासमोर भारताला रोखण्याचे कठीण आव्हान असणार आहे.
भारताचा संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, विजय शंकर, हार्दिक पंड्या, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जाडेजा, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत
वेस्ट इंडीज संघ: जेसन होल्डर (कर्णधार), क्रिस गेल, शाई होप, शिमरॉन हेटमेयर, कार्लोस ब्रॅथवेट, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस, केमार रोच, अॅश्ले नर्स, निकोलस पूरन, सुनील अंबरीश, एविन लुईस, शेनन गॅब्रिएल, डेरेन ब्रावो आणि फाबियान एलेन