नवी दिल्ली प्रतिनिधी । भारत आणि द. आफ्रिकेदरम्यान कसोटी मालिकेला विशाखापट्टणम टेस्टपासून सुरूवात होणार आहे. हा सामना डॉ.वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट मैदानावर उद्यापासून सुरू होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विराटने घरच्या मैदानांवर एकूण ३४ कसोटी सामने खेळले आहेत आणि एकूण ३१०५ धावा बनवल्या आहेत. या दरम्यान त्याच्या नावावर एकूण ११ शतक नोंदवले गेले आहेत. घरच्या मैदानावर कमीत कमी ३,००० धावा कुटणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये कोहलीची सरासरी सर्वात चांगली आहे. अन्य देशांच्या फलंदाजांबाबत सांगायचं तर जागतिक विक्रम डॉन ब्रॅडमनच्या नावे आहे. ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमनने ३३ कसोटी सामन्यांमध्ये ९८.२२ च्या सरासरीने ४,३२२ धावा केल्या आहेत. त्यांच्या नावे १८ शतकांची देखील नोंद आहे. भारतीय फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे मधल्या फळीतला दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा. पुजाराने देशात ३६ कसोटी सामने खेळले आहेत आणि ३,२१७ धावा बनवल्या आहेत. यात १० शतकांचाही समावेश आहे. त्याचा रनरेट ६१.८६ चा आहे. ओवरऑल फलंदाजांमध्ये त्याचा क्रमांक सातवा आहे. मायकल क्लार्क सहाव्या स्थानी आहे. क्लार्क ने आपल्या देशात ऑस्ट्रेलियात एकूण ५३ कसोटी सामने खेळले आहेत. त्याचा रनरेट ६२.०५ आहे. त्याने ४,६५४ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये १७ शतक बनवले आहेत.