जागतिक युवा स्पर्धेसाठी भाग्यश्री पाटीलला शुभेच्छा

WhatsApp Image 2019 10 01 at 12.25.06 PM

जळगाव, प्रतिनिधी  | दोन ऑक्टोबरपासून मुंबई येथे सुरू होणाऱ्या जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेकरिता भाग्यश्री पाटीलची भारताच्या संघात निवड झाल्याने आज जिल्हा क्रीडा संकुल येथे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भाग्यश्री पाटील हिचा सत्कार व निरोप समारंभ देण्यात आला.

सर्वप्रथम महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार तथा जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष फारुक शेख यांनी भाग्यश्रीने २०१८-१९ या वर्षात केलेली दैदीप्यमान कामगिरीचा आढावा सादर केला. तिने नुकत्याच झालेल्या साऊथ एशियन स्पर्धेत क्लासिक व ब्लिट्ज स्पर्धेत दोन सुवर्णपदक पटकविले. ती पाचोरा गो. से. विद्यालयाची विद्यार्थिनी व जैन स्पोर्ट्स अकॅडमीची खेळाडू आहे. खान्देश मधून प्रथमताच वयाच्या १४ वर्षाआतील मुलीला वुमेन फिडे मास्टर हा बहुमान मिळाल्याबद्दल तिचे विशेष कौतुक करून तीस जिल्हा बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनातर्फे भेटवस्तू देऊन नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या हस्ते ग़ौरविन्यात आले. यावेळी व्यासपीठावर फारूक शेखसह तथा भाग्यश्री चे पूर्वाश्रमीचे प्रशिक्षक प्रवीण ठाकरे, संघटनेचे सहसचिव संजय पाटील, गो. से. विद्यालयाचे क्रीडा शिक्षक नरेंद्र पाटिल, तालुका क्रीडा अधिकारी मार्क धर्माई, हॉलीबॉलचे प्रशिक्षक राजेन्द्र चौहान, क्रीड़ा अधिकारी एम. के. पाटिल, तथा डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. अनिता कोल्हे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ठाकरे यांनी केले तर आभार संजय पाटील यांनी मानले. जागतिक युवा स्पर्धेसाठी जात असलेल्या भाग्यश्री पाटिल हिस महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक जैन, अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, खजिनदार फारुक शेख , गो. से.चे मुख्याध्यापक एस. डी. पाटिल तसेच जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.

Protected Content