बांगलादेशमधील मोंगला बंदराचे टर्मिनल भारताला मिळाले

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हिंदी महासागरात चीनच्या वाढत्या प्रभावादरम्यान भारताने मोठा विजय मिळवला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, मोंगला बंदराच्या टर्मिनलच्या ऑपरेशनसाठी भारताने बांगलादेशशी करार केला आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आल्या असतानाच हा करार झाला आहे.भारताने केलेल्या या कराराकडे हिंदी महासागरात चीनचा मुकाबला करण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

चीनही या बंदरावर लक्ष ठेवून होता. चितगाव बंदरानंतर मोंगला बंदर हे बांगलादेशातील दुसरे मोठे बंदर आहे. हे तिसरे विदेशी बंदर असेल, ज्याच्या ऑपरेशनची जबाबदारी भारतावर असेल. या वर्षाच्या सुरुवातीला भारताने म्यानमारसोबत स्वेत बंदर आणि इराणसोबत चाबहार बंदरासाठी करार केले आहेत. मोंगला बंदर सौद्याशी संबंधित माहिती अद्याप समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे टर्मिनल इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड द्वारे चालवले जाईल.

Protected Content