बेंगळुरू वृत्तसंस्था । टी-२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला ९ विकेट राखून पराभूत केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘संघ अशा पद्धतीच्या सपाट खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यापासून कदापि मागे हटणार नाही. अशा खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करून स्वतःला आजमावत राहू. हा आमच्या रणनितीचा भाग आहे,’ असं कोहली म्हणाला. आम्हाला अशाच प्रकारची लढत अपेक्षित होती. टी-२० वर्ल्डकपपूर्वी आम्हाला अशा प्रकारच्या कठीण लढतींना सामोरं जायचं आहे. मोठ्या स्पर्धेत खेळण्यापूर्वी प्रथम फलंदाजी करण्याचा ‘पॅटर्न’ आजमावत राहू, असंही त्यानं सांगितलं. यावेळी कोहलीनं दक्षिण आफ्रिका संघाचं कौतुक केलं. त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात त्यांच्या गोलंदाजीला खेळपट्टीची चांगली साथ मिळाली, असं कोहली म्हणाला.