युनिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

मुक्ताईनगर शहरातील युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूल येथे ७७ वा स्वातंत्र्य दिवस  चिमुकल्यांनी अत्यंत उत्साहाने साजरा केला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लाईव्ह ट्रेंड न्यूजचे मुख्य संपादक शेखर पाटील, सुप्रसिद्ध अँकर तथा पत्रकार, कवि, कलावंत तुषार वाघुळदे, शरद  भालेराव,  शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री मासुळे सर, मुख्याध्यापिका सौ. जयश्री मासुळे, पत्रकार पंकज कपले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

 

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शेखर पाटील यांनी आपल्या मनोगतातून मुक्ताईनगर सारख्या शहरात युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूलच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आत्माराम मासोळे सरांचे कौतुक केले. तर तुषार वाघुळदे यांनी आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

या कार्यक्रमाला  सर्व पालक व शिक्षिका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीपणे सूत्रसंचालन सौ. प्रतीक्षा काटे यांनी केले.

Protected Content