जळगाव प्रतिनिधी । स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती होती.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री ना. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ना. गुरुमुख जगवाणी, आमदार श्रीमती स्मिता वाघ, आमदार चंदूलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, महापौर सिमा भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप वनसंरक्षक दिगंबर पगार, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, शुभांगी भारदे, उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, लहानमुले मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना पालकमंत्री ना. गिरीश महाजन म्हणाले की, गेल्यावर्षी आपल्या जिल्ह्यात पावसाची स्थिती चिंताजनक होती. यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये चांगला साठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सिंचनाची क्षमता वाढावी याकरीता शेळगाव बॅरेज व वरखेड लोंढे प्रकल्पाचा बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करण्यात आला आहे. गिरणा नदीवरील ७ बलुन बंधार्यांना मंजूरी मिळाली आहे. मेगा रिचार्जसारखा प्रकल्पाला चालना मिळाली आहे. त्याचबरोबर तापी नदीच्या पुर पाण्यातून पाडळसे धरण भरण्यात येवून अमळनेर, पारोळा, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांसाठी कायमस्वरुपी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पाडळसे (निम्नतापी) धरणाकरीता नाबार्डकडून १५०० कोटी रुपयांसह राज्यातील इतर प्रकल्पांसाठी १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील भागपूर, बोदवड सिंचन, वरणगाव-तळवेल आदि योजनांचा समावेश आहे. त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आवाहनदेखील केले.
यावेळी पालकमंत्री ना. महाजन यांच्या हस्ते हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट संकल्पना सादर केल्याबद्दल ममता महिला बचत गट, यशवंत नगर, भडगाव, धम्मदिप महिला बचत गट, टोनगाव, ता.भडगाव, सुरभी महिला बचत गट, कंकराज, ता.पारोळा, पंचमुखी महिला बचत गट, पारोळा, एकविरा माता स्वयंसहाय्यता समुह, हिंगोणे बु. ता. धरणगाव, गणपती महिला बचत गट, फैजपूर, ता.यावल, सरस्वती महिला बचत गट, भालगाव, ता. एरंडोल, साईकृपा स्वयंसहायता समुह, सावळा, ता. धरणगाव, जय अंबिका महिला बचत गट, शेंदूर्णी, ता.जामनेर, श्री. गुरूदत्त महिला बचत गट, शहापुर, जामनेर यांना सन्मानित करण्यात आले. तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परिक्षेत राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्याबद्दल चि. पंकज रोहिदास पाटील, पंकज सेकंडरी न्ड हायर सेकंडरी स्कुल, चोपडा, चि. राजनंदिनी रमेश जाधव, न्यु इंग्लीश स्कूल, जामनेर, चि. आयुष्य दिवाण वालेचा, चि. हर्ष सुधाकर सपकाळे, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल, जळगाव यांचा तर शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आल्याबद्दल कु. इश्वरी सुनिल पाटील, निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा, कु. विधी मकरंद नेहेते व चि. ओम गोपाल चौधरी, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल, जळगाव. कु. अश्विनी भाऊसाहेब पाटील, पोतदार इंटरनॅशनल स्कुल, जळगाव. कु. गौरी सुशिलकुमार राणे, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल, जळगाव. चि. पार्थ प्रशांत पाटील व चि. ओम चंद्रकांत चौधरी, रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, जळगाव, चि. निश्चय संदिप पाटील, ऑरीयन सीबीएसई इग्लीश मेडीअम स्कुल, जळगाव, चि. कलश पंकज भैय्या, एल. एच. पाटील इंग्लीश मेडीयम स्कूल, जळगाव, कु. मैत्रण्या महेश पाटील, श्री. एन. टी. मुंदडा ग्लोबल व्यु स्कुल, अमळनेर यांचा गौरव करण्यात आला. यासोबत पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा-२०१९ मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय पारितोषिक- तृतीय अनोरे, ता. अमळनेर, तालुकास्तरीय पारितोषिक- प्रथम- चिंचोली पिंप्री, ता. जामनेर, अभोणे तांडा, ता. चाळीसगाव, निंब, ता. अमळनेर आणि मोंढाळे प्र.अ., ता. पारोळा, जळगाव जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्वश्री. दिनेश चंपालाल पाटील, पोलीस पाटील, धानोरा, ता. चोपडा, प्रविण धनगर पाटील, पोलीस पाटील, झाडी, ता.अमळनेर, नरेंद्र लोटन पाटील, चंद्रकांत भगवान पाटील, मिलिंद डिगंबर सोनवणे, महेश मुरलीधर पाटील, विजयसिंग धनसिंग पाटील, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, मनोज सुभाष पाटील, जळगाव शहर पोलीस स्टेशन, दिनेश रमेश मारवडकर, पहुर पोलीस स्टेशन यांचा पाकलमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र, जळगाव जिल्हा कॉफी टेबलबुक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत निवृत्त विभागीय आयुक्त रविंद्र जाधव यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री ना. महाजन यांच्याकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. उस्मानी व राजेश यावलकर यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा ७२ वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रशासकीय इमारत येथे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय इमारतीमधील शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.
या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा ७२ वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रशासकीय इमारत येथे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासकीय इमारतीमधील शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.