Home Cities चोपडा अडावदच्या शामराव येसो महाजन विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाने वेधले लक्ष

अडावदच्या शामराव येसो महाजन विद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह; विद्यार्थ्यांच्या पथसंचलनाने वेधले लक्ष

0
11

अडावद (ता. चोपडा)-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अडावद येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालय, आदर्श प्राथमिक शाळा व पूर्व प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, देशभक्तीपर कवायत, संविधान वाचन आणि शिस्तबद्ध पथसंचलनामुळे शाळेच्या परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

शाळेच्या प्रांगणात सकाळी साडेसात वाजता मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. संस्थेचे अध्यक्ष भगवान शामराव महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम्’ गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव महाजन, सचिव रमेश पवार, सहसचिव तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर. डी. माळी, संचालक मंडळातील सदस्य, गावातील विविध सहकारी संस्थांचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर आकर्षक कवायत सादर केली. आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाचे वाचन करून संविधानाच्या मूल्यांची ओळख उपस्थितांना करून दिली. यानंतर स्काऊटच्या आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत ध्वजवंदना केली.

बँड पथकाच्या सुरेख तालावर सर्व विद्यार्थी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शामराव येसो महाजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे यांच्यासह एन. ए. महाजन, एस. जी. महाजन, एम. एन. माळी, पी. आर. माळी, एस. बी. चव्हाण, एस. के. महाजन, पी. एस. पवार, डी. डी. महाजन यांनी परिश्रम घेतले. आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. महाजन तसेच एस. टी. महाजन, आर. जे. महाजन, वाय. एल. साळुंखे, डी. आर. वाघ, कामिनी चौधरी यांनीही नियोजनात योगदान दिले.

पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षिका पूनम सुतार, वर्षा महाजन, कविता महाजन, सुनीता महाजन तसेच शिक्षकेतर कर्मचारी सी. एस. महाजन, ईश्वर मिस्तरी, रविंद्र महाजन, कैलास महाजन आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

 

 


Protected Content

Play sound