स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रोग्रेसीव्ह स्कूलमध्ये चैतन्याला उधाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील प्रोग्रेसिव्ह स्कूलमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

पिंप्री खु येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडिअम स्कूल , आदर्श बालक ,प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम विद्यार्थ्यांना विविध महापुरुषांचे वेष परिधान करण्यात आले त्या नंतर प्रभात फेरीत घोषणानी आपली कृतज्ञाता व्यक्त केली. ध्वजारोहण सेवानिवृत्त मुख्याध्यापक एकनाथ देवराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी आदर्श माध्यमिक बॅच च्या १०० % निकाल लागलेल्या बॅच चा सत्कार करण्यात आला. यात महेश्वरी बडगुजर (प्रथम) , विवेक बडगुजर (द्वितीय) , असमा शेख (तृतीय ) व सर्व यशस्वींचा गौरव करण्यात आले.
तसेच नवनियुक्त केंद्रप्रमुख श्री प्रमोद पाटील सर ,तसेच ऍड गजानन पाटील (सचिव – वकील संघटना धरणगाव) यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी दिलीप तायडे सर (सेवानिवृत्त सहायक फौजदार जळगाव ), प्रा सुरज वाघरे , पापा वाघरे , कमलाकर मोहिते आदी उपस्थित होते.

Protected Content