यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील तहसील कार्यालयासमोर २९ जुलै २०२४ रोजी निळे निशान संघटनेच्या वतीने निदर्शने करून निवेदन देण्यात आले होते परंतु आज पावेतो प्रशासनाच्या वतीने यावलच्या रुग्णालयात कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आलेली नाही तसेच यावल तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या विविध समस्या व अनुसुचीत जाती- जमातीच्या समुदायावर जाणीवपुर्वक घाणेरड्या मानसिकतेने आपल्या पदाचा अधिकाराचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कृत्य आपल्या निदर्शनास येईल या उद्देशाने ५ ऑगस्ट २०२४ रोजी संघटनेच्या वतीने मोर्चाच्या माध्यमातून खालीलप्रमाणे नमुद असलेले विषयांचे निवेदन घेऊन यावल तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरिबांसह दलित आदिवासी समुदायास न्याय मिळेल या अपेक्षेने आलो आहोत.
१) गर्भवती महिलांची ग्रामिण रुग्णालय यावल येथे होणारी हेळसांड थांबविण्यात यावी.
२) यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञांची नेमणुक नाही तरी यावल ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करून उपचाराची जबाबदारी कोणत्या डॉक्टरांकडे निश्चीत केली जाते यांची चौकशी करण्यात यावी.
३) यावल ग्रामीण रुग्णालयात कुठल्याही तज्ञ डॉक्टरांची नेमणूक नसतांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया कुठल्या डॉक्टरांकडून केल्या जातात याची चौकशी करण्यात यावी.
४) वैद्यकीय अधिक्षक यानी दिलेल्या माहितीनुसार दररोज ५०० बाह्य रुग्णाचा उपचार केला जातो परंतु प्रत्येक दिवसाला अंतररुग्ण किती याची चौकशी करण्यात यावी.
५) वैद्यकीय अधिक्षक यांच्या माहितीनुसार महिन्याला सरासरी २५ ते ३० प्रसुती दरम्यान आपातकालीन समयी एकद्या स्त्रीला उपचाराची गरज भासल्यास स्त्री रोग तंज्ञ नसतांना कुठल्या डॉक्टारांकडे जबाबदारी निश्चित केली जाते. वैद्यकिय अधिक्षक याच्या माहितीनुसार सध्या ग्रामीण रुग्णालय न्हावी येथिल नैत्र चिकित्सक तज्ञ यांना दर शुक्रवारी नेहमी नैत्र तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय यावल येथे प्रती नियुक्ती देण्यात आलेली आहे तरी ग्रामीण रुग्णालय न्हावी येथिल नेत्र चिकित्सा तज्ञ यांना प्रति नियुक्ती कधी देण्यात आली याचा खुलासा करण्यात यावा.
६) शवविच्छेदन गृहाची दुरुस्ती करून तेथे शीत पेटीची व्यवस्था करण्यात यावी.
७) नवजात शिशुंकरता तात्काळ अतिदक्षता गृह कार्यान्वित करण्यात यावे. आपातकालीन समयी रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करण्यात यावी. स्त्रीरोग तज्ञ तसेच इतर तज्ञ डॉक्टरांची यावल ग्रामीण रुग्णालयात तात्काळ नियुक्ती करण्यात यावी.
८) दीड ते दोन वर्षभरापासुन गटविकास अधिकारी पंचायत समिती यावल यांना वारंवार टेंभीकुरण व धुळेपाडा या गावांच्या समस्या संदर्भात निवेदन देऊन सुद्धा आजपावोत गटविकास अधिकारी यांनी जाणिवपुर्वक व्देषभावनेतून टेंभी कुरण व धुळेपाडा येथिल दलित – आदिवासी समाजाला आपल्या हक्कापासून वंचित ठेवण्याचे महापाप केलेले आहे तरी अशा जातीवादी गटविकास अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
९) सन २०२३ मध्ये धुळेपाडा येथे आदिवासी समाजाला पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागत होती तेव्हा पाणी पुरोवठा विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या टुबवेलचे काम का बंद करण्यात आले ? याची चौकशी करून पाणीपुरवठा अधिकारी यांच्यासह संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
१०) विधवा, परितक्ता, घटस्फोटीत, अंध, अपंग, निराधार लोकांना अन्न सुरक्षा यादीत समाविष्ट करणे.
११) यावल ग्रामीण रुग्णाल्याचे वैदकीय अधिक्षक यांनी रुग्णाच्या संदर्भात दिशाभुल करणाऱ्या माहितीची चौकशी करून त्याना कायमस्वरूपी कार्यमुक्त करण्यात यावे.
१२) यावल तालुक्यातील भालशिव ग्राम पंचायतीचे विधमान ग्रामसेवक यानी जाणिवपुर्वक जातीय द्वेष भावनेतुन टेंभीकुरण गावातील दलित – आदिवासी समाजाला त्यांचा मुलभुत हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
या वरील मागण्याकरिता निळे निशान संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे, विभागीय उपाध्यक्ष अनिल इंधाटे, इकबाल तडवी, सागर तायडे यांच्या नेतृत्वाखाली दि ‘ १२ ऑगष्ट २०२४ पासून बेमुदत ठिय्या आंदोलन शुरू करण्यात आले आहे. लवकरच समस्यांचे निराकरण न झाल्यास ठिय्या आंदोलनाचे रुपांतर आमरण उपोषणात करण्यात येईल असे निवेदन संबंधिताना देण्यात आले .