पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा शहरातील कॉलनी भागात रात्रीच्या वेळेस अंगणात लावलेल्या मोटर सायकलच्या बॅटरी व पेट्रोल चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी कॉलनी धारक कडून करण्यात येत आहे.
अपूर्ण पोलिस संख्या अभावी आहे त्या पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यास पोलीस हे कमी पडत आहे. त्याचाच गैरफायदा भुरटे चोर घेऊन शहरात व कॉलनी भागात रात्रीच्या वेळेस मोटरसायकलच्या बॅटरी चोरणे,पेट्रोल चोरणे आदी प्रकार वारंवार करीत आहे. तसेच ठीक ठिकाणी उभ्या असलेल्या मोटर सायकली चोरीच्या घटना देखील वाढत आहेत. काही गुन्हे हे दाखल होत आहेत.तर काही गुन्हे हे दाखल न करता नागरीक आपले आर्थिक नुकसान मुकाट्याने सहन करीत आहेत.
पोलिसांचा संपर्क हा दिवसेंदिवस कमी होत असल्याने या चोरांची संख्या व गुन्हे देखील वाढीस लागले आहेत. पोलिसांनी तातडीने भुरटे चोरावर प्रतिबंध घालून शहरवाशी ,कॉलनी धारकांची मालमत्ता सुरक्षित राहण्या संदर्भात सुस्ती सोडून वचक निर्माण करण्यासाठी अधिकधिक उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.