भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था पुणे येथे आयोजित किसान सम्मान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे जळगाव जिल्हा बनाना क्लस्टर मध्ये समाविष्ट केल्याबद्दल विशेष आभार व्यक्त करतांना केंद्रीय कृषिमंत्री यांना २४ ऑगस्ट रोजी कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद येथील भेटी दरम्यान किरण जाधव ( शास्त्रज्ञ) यांच्या प्रयत्नांनी श्री गिरणाकाठ शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने जळगाव बनाना क्लस्टर मध्ये समाविष्ट करण्यात यावा.
यासाठी निवेदन देण्यात आले होते व 3 डिसेंबर रोजी पिचर्डे येथील केळी परिसंवाद कार्यक्रमात अपेडाचे मुंबई डीजीएम प्रशांत वाघमारे साहेबांना निवदेन देण्यात आले होते व गेल्या ४ ते ५ वर्षांपासुन जिल्ह्यातील आजी-माजी आमदार , खासदार याच्या सार्वत्रिक प्रयत्नामुळे बनाना क्लस्टर घोषीत झाले. या भेटी दरम्यान जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने किरण जाधव शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद व विनोद बोरसे अध्यक्ष श्री गिरणाकाठ शेतकरी उत्पादक कंपनी भडगावच्या केद्रींय कृषी मंत्री साहेबांचे आभार व्यक्त केले.