मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | उत्तर प्रदेशातील माध्यमिकसह उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी भाषा म्हणून मराठीचा समावेश करावा अशी विनंती भाजपचे कृपाशंकरसिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेकडे केली आहे.
उत्तर प्रदेशातून अनेक युवक युवती उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी महाराष्ट्रात येतात. मराठी भाषेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. उत्तर प्रदेशाच्या शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध झाल्यास विद्यार्थी युवकांना त्याचा महाराष्ट्रात फायदा होऊ शकतो, या उद्देशाने भाजपचे कृपाशंकरसिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेकडे मागणी केली असून हि सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडे विचाराधीन असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.