जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भुसावळ रोडवरील युवराज माळी यांनी नव्याने सुरू केलेल्या विठूमाऊली ठिबक सिंचन या नवीन दुकानाचे मंत्री गिरीष महाजन यांच्याहस्ते नुकतेच फित कापून उद्घाटन करण्यात आले. या शुभारंभ प्रसंगी दुकानाला शहरातील असंख्य मान्यवरांनी भेट देत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
काम हेच कर्तव्य मानून गेल्या दोन ते तीन दशकांपासून तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत, देशाचा आर्थिक कणा असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत ठिबक सिंचन संचाचे महत्व काय आहे, ठिबक संच वापरामुळे शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होतो, पाण्याची किती बचत होते हे शेतकऱ्यांना युवराज काशिनाथ माळी यांनी पटवून दिले. अहोरात्र मेहनत करून, शून्यातून विश्व निर्माण करणारे युवराज माळी यांनी दि.३० जून रोजी जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील कॉम्प्लेक्समध्ये आपल्या तिसऱ्या ठिबक सिंचन शाखेचा शुभारंभ केला आहे.
मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते सोमवारी दिनांक १ जुलै रोजी दुपारी युवराज माळी यांच्या “श्री.विठूमाऊली ठिबक सिंचन”या तिसऱ्या नवीन शाखेचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यांच्याकडे सर्व नामांकित कंपनीचे ठिबक व तुषार सिंचन उपलब्ध आहे. यावेळी जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, दिपक पाटील, आतिष झाल्टे, दिपक तायडे, रविंद्र झाल्टे, सुनिल इंगळे, देविदास विसपुते, नितीन इंगळे, शांताराम झाल्टे आदी उपस्थित होते.