विविध रस्त्याच्या कामांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील प्रजिमा 57 ते खामखेडा ते अंजनविहीरे रस्त्याचे भूमिपूजन तसेच वराड बु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 (हायवे पर्यंत) या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी ग्रामीण भागात पक्के रस्ते होणे गरजेचे आहे यासाठी ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते निर्मितीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून या कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव तालुक्यातील प्रजिमा 57 ते खामखेडा ते अंजनविहीरे रस्त्याचे भूमिपूजन तसेच वराड बु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 (हायवे पर्यंत) या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यापूर्वी याच प्रजिमा 57 ते खामखेडा ते अंजनविहीरे रस्त्यावर २कोटी ६४ लाख निधी खर्च करून मोठ्या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले असून लवकरच पुलाचे लोकार्पण होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले

या रस्त्यांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण –

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 1 कोटी 26 लक्ष 11 हजार  रुपये मंजूर निधीतून प्रजिमा 57 – खामखेडा – अंजनविहीरे या   2.50 किमी लांबीच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाला तसेच ना. गुलाबराव पाटील यांच्या स्थानिक आमदार  विकास निधी अंतर्गत वराड बु. राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 ( हायवे पर्यंत) या रस्त्याचे डांबरीकरण कामाचे  लोकार्पण जिल्ह्याचे  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ढोल ताश्यांच्या गजरात व फटके फोडून गावातून ना. गुलाबराव पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात येऊन त्यांचा ग्रामस्थांनी सत्कार  केला.

यांची होती उपस्थिती –

यावेळी वराड बु. येथे माजी सभापती अनिल पाटील, विभाग प्रमुख टिकाराम पाटील , रविंद्र पाटील,शाखा प्रमुख सोमनाथ पाटील, युवसेनेचे मोरेश्वर पाटील,  आबा चौधरी , वि. का. सोसा. चेअरमन समाधान चौधरी,ग्रा.पं. सदस्य संजय पवार , विकास पाटील व  नाना चौधरी, तर अंजन विहीरे येथे रविंद्र चव्हाण सर , सरपंच धीरज पाटील, डॉ. विलास चव्हाण, वि. का. सोसा. चेअरमन राजेंद्र पाटील , डी. ओ. पाटील , सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार , ठेकेदार भगवान महाजन मुरलीधर पाटील, खंडेराव पाटील प्रकशआबा पाटील, रोहिदास पाटील यांच्यासह परिसरातील सरपंच, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रविंद्र चव्हाण सर यांनी केले . तर प्रास्ताविक व आभार सरपंच धिरज पाटील यांनी मानले.

Protected Content