Home Cities जळगाव उमवित संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन

उमवित संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन


जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील पर्यावरण आणि भूशास्त्र प्रशाळा व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी संशोधन प्रकल्प सादरीकरण स्पर्धा नुकतीच घेण्यात आली.

या स्पर्धेचे उद्घाटन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.सत्यजित साळवे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी डॉ.संजयकुमार थोरात होते. प्रारंभी समन्वयक डॉ.व्ही.एम.रोकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.थोरात यांनी संशोधनाचे महत्व विशद केले. या स्पर्धेत 80 स्पर्धकांनी भाग घेतला. यावेळी प्रा.एस.एन.पाटील, प्रा.अत्तरदे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound