Home क्रीडा बद्रिनाथ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये खेळ साहित्याचे उद्घाटन

बद्रिनाथ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये खेळ साहित्याचे उद्घाटन

0
34

sports

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बहादरपूर येथील नूतन शिक्षण संस्था संचलित बद्रिनाथ इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये नुकतेच विविध खेळ साहित्याचे उद्घाटन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव बडगुजर, प्रमुख अतिथी सुनिल चौधरी संस्थेचे उपाध्यक्ष अनिल शिंपी, संचालक कैलास पाटील, वसंत मेखे, प्रकाश बडगुजर, सुभाष गुरव, मोतीराम मिस्तरी, मुख्याध्यापक मनोज चौधरी या मान्यवरांच्या हस्ते देवी शारदेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक चौधरी यांनी सर्वांचे स्वागत करत कार्यक्रमाचे प्रसाताविक केले. प्रमुख अतिथी सुनिल चौधरी यांनी बुद्धिबळचे उद्घाटन करत मुलांना या खेळाविषयी माहिती दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कँरम बोर्ड, बैडमिंटन, क्रिकेट, फुटबाँल व इतर खेळांचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक मनोज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रुपाली चौधरी, सुरेश पाटील, चारुशीला पाटील, मदतनीस अलका चौधरी, चंदू लोकाक्षी, नथ्थू पाटील आदींनी अथक परिश्रम घेतले आहे.


Protected Content

Play sound