कोरपावलीत शास्त्री श्रीप्रसादजी यांच्या श्रीमद रामकथा सप्ताहाचा शुभारंभ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील कोरपावली येथे श्रीमद् रामकथा ज्ञानयज्ञ पारायण साताहाची सदगुरू शास्त्री श्रीभक्ती प्रसादजींच्या मधुर वाणीने भाविक भक्तांच्या भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली आहे.

कोरपावली येथे मुख्य आयोजक कोरपावली येथील विकास सोसायटीचे चेसरमन राकेश वसंत फेगडे व श्री स्वामीनारायण मंदीर कोरपावली व समस्त सत्संग समाज व महिला मंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नानी जैन विद्यालयाच्या प्रांगणावर सुरू झालेल्या या श्रीमद् रामकथा ज्ञानयज्ञ पारायण सप्ताहाची सुरूवात झाली आहे.

या सप्ताहाचा शुभारंभ सदगुरू शास्त्री श्रीभक्तीप्रसादजी,सप्ताहचे मुख्य आयोजनकर्त राकेश फेगडे, कथेचे यजमान बोंदर किसन नेहते व मालतीबाई नथ्थु नेहते यांच्या मोक्षार्थ व सुकलाल बोंदर नेहते, प्रकाश बोंदर नेहते यांच्यासह आदींच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाला.

या निमित्ताने महाप्रसादाचे यजमान निंबा विठो फेगडे यांच्या मोक्षार्थ हे असुन दिनांक १८ फेब्रुवारी रोजी राम-भरत मिलन , दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शबरीची बोर, दिनांक २० फेबुवारी रोजी रामेश्वर ज्योतिर्लिगम स्थापना व दिनांक२१ फेब्रुवारी राम राज्यभिषेक व दिंडी सोहळ्यानंतर सप्ताहाची सांगता होईल. या श्रीमद्र रामकथा ज्ञानयज्ञ पारायण सप्ताहासाठी कोरपावली, महेलखेडी व परिसरातुन भक्ता भाविकांची मोठी उपस्थिती दिसुन येत आहे.

या पारायण सप्ताहाचा भक्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक राकेश फेगडे व श्री स्वामीनारायण मंदिर कोरपावली व सत्संग समाज महिला मंडळ कोरपावली व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content