अमळनेर तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे सेल्फी पॉईंटचे उद्घाटन

अमळनेर प्रतिनिधी । जपान मधील टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी म्हणून शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचनालय यांच्या सूचनेनुसार तालुका क्रीडा संकुल समितीतर्फे सेल्फी पॉईंटचे उदघाटन माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराणा प्रताप चौकातील जिप विश्रामगृहजवळ मिशन ऑलिम्पिक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार मिलिंद वाघ , खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष जितेंद्र जैन , माजी चेअरमन नीरज अग्रवाल , प्रवीण जैन , अर्बन बँक संचालक  प्रवीण पाटील , माजी उपनगराध्यक्ष चांदूसिंग परदेशी ,आरोग्य सभापती श्याम पाटील , नगरसेवक मनोज पाटील , हेमंत पवार हजर होते.

या कार्यक्रमाचे आयोजन तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील वाघ यांनी केले. तर कार्यक्रमास केंद्रप्रमुख शरद सोनवणे , महेश माळी ,क्रीडा संघटनेचे कार्यध्यक्ष संजय पाटील ,किशोर मोरे, जितेंद्र ठाकूर, स्वप्नील पाटील,  रेहान शेख, हर्षद शेख, विशाल काळे व खेळाडू  यावेळी अनेकांनी सेल्फी काढून ऑलिम्पिक खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!