भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळातील जवाहर नवोदय विद्यालयात दोन दिवशीय प्रादेशिक सांस्कृतिक एकात्मता संमेलन व कला प्रदर्शनी या विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज याचा शुभारंभ करण्यात आला.
भुसावळ येथील जवाहर नवोदय विद्यालयात दोन दिवसीय रिजनल कल्चलर मीट एन्ड आर्ट एक्झीब्युशन २०२३ हा दोन दिवशीय रिजनल लेव्हलचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम दिनांक २ व ३ डिसेंबर रोजी असून या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र,गोवा, गुजरात,द्वीपदमण येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी या दोन दिवसात विविध कल्चलर प्रोग्राम व राईटिंग रेगूशन,सेमिनार, नृत्य, गायन, नाटक अशा विविध प्रकारच्या स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमासाठी पहिल्यादिशी प्रमुखम हाराष्ट्र शासन, ,बी. वेंकटेश्वरन आयुक्त,नवोदय विद्यालय समिती पुणे संभाग या मान्यवरांची उपस्थिती होती. तर, समारोप समारंभात विजेत्यांना दिनांक ३ रोजी बक्षीसे व प्रमाणपत्र दिले जाणार असल्याची माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य विजय अंभोरे यांनी दिली.