यावल वनविभागात पहिल्यांदाच निसर्ग पाऊल वाटेचा शुभारंभ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल वन विभागाचे उपवन संरक्षक जमीर शेख यांच्या पुढाकाराने निसर्ग पाऊलवाट हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

जमीर मुनीर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव यांच्या संकल्पनेत्ूान आपल्या सातपुड्यात एक निसर्ग पाऊलवाट तयार करण्याचा संकल्प हाती घेतला होता, प्रथमेश व्ही.हाडपे सहाय्यक वनसंरक्षक चोपडा व समाधान एम.सोनवणे वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांच्या मार्गदर्शनाने वैजापूर वन विभागात सातपुडा निसर्ग पाऊलवाट तयार करण्यात आली, असून गुरूवारी वन्यजीव सप्ताहाचे औचित््या साधून या पाऊलवाटचे उदघाटन उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांच्या हस्ते करण्यात आले, जळगाव जिल्ह्यास सुंदर असं सातपुड्याचा वैभव लाभलेला आहे, या पर्वताचे संरक्षण संवर्धन आणि आपला सातपुडा जगासमोर आणण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. सध्या मानवी जीवन हे फार धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे अशातच आपल्याला एक निवांत वातावरण आणि निसर्ग अनुभवण्यासाठी ही निसर्ग पाऊलवाट आम्ही सुरू केलेली आहे. शहरापासून कुठेतरी लांब आणि नैसर्गिक वातावरणात मन रमण्यासाठी किंवा मोबाईल पासून दूर जाण्यासाठी निसर्ग हीच खरी शांतता आहे, आणि सध्याच्या काळात निसर्गात जाऊन फोटोग्राफी करणे हा फार मोठा ट्रेण्ड आहे म्हणूनच ह्या पाऊलवाट वरती कुणालाही सातपुड्याने पांघरलेली हिरवी शाल पहावयास मिळणार आहे, जसं की पाऊलवाट वरती चालण्यास सुरवात झाली की आपल्याला सातपुडा पहावयास मिळणार आहे. यासोबत ट्रेक पूर्ण करत असतांना चौसिंगा मचाण,नीलगाय संरक्षण कुटी, बिबट मचाण आणि पश्चिम प्रदेशातील नवरंग ह्या पक्षाचे दर्शन होणार आहे व नैसर्गीक वाहणारा पाण्याचा नाला ही पहावयास मिळणार आहे,तसेच जुन्या काळातील एक नावजी बाबा मंदीर म्हणून शेवटचे ठिकाण पहावयास मिळणार आहे, तसेच काही वनस्पती व झाडांचीही ओळख होणार आहे.

ही पाऊलवाट एकंदरीत तीन किलामीटर अंतराची असून परतीला सहा किमी अंतराची असणार आहे आणि एक शारीरिक ऊर्जा ही देणारी आहे,हे सर्व आपण पायी ट्रेक करत अनुभवत असतांना पाऊलवाटा वरती थकल्यास किंवा विश्रांती साठी बांबू पासून बनवलेले नैसर्गिक टेबल ही बनवण्यात आले आहेत. या पाऊलवाट वरती चालत असताना स्वतःसोबत निसर्गाची काळजी घ्यावयाची आहे ती म्हणजे अशी की, पायी चालत असताना कोणत्याही झाडाच्या पानांना फुलांना इजा पोचणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे तसेच स्स्वछता याचे भान ठेवून निसर्गात कोणत्याही प्रकारे प्रदूषण होणार नाही किंवा प्लास्टिकचा वापर टाळावयाचा आहे. तसेच निसर्गाचा आनंद घेण्यासाठी किंवा वन्य प्राण्यांचा अधिवास जाणून घेण्यासाठी आपण शांततेत पाऊलवाट वरती चालावयाचे आहे आणि वन विभागातील वनसेवक किंवा वन कर्मचारी यांचे मार्गदर्शन घ्यावयाचे आहे.

या निसर्ग पाऊलवाट वरती येण्यासाठी निसर्गाशी सुसंगत कपड्यांचा वापर करावयाचा आहे, पिण्यासाठी पाण्याची बॉटल स्वतः आणावी तसेच पक्षी निरीक्षण करण्यासाठी आपण स्वतःची दुर्बीण ( बायनाकुलर) आणावी. ह्या सर्व बाबी लक्षात घेता सातपुडा निसर्ग पाऊलवाट आणि यावल वनविभाग जळगांव हाच संदेश देणार आहे की आपला सातपुडा एवढा सुंदर असुन त्याचे महत्व, संरक्षण संवर्धन करण्यासाठी आपण एकदा तरी सातपुड्याच्या कुशीत जाऊन त्याला अनुभवयाचा आहे व त्याचे संरक्षण आणि संवर्धनसाठी एक जुटीने करावयाचे असल्याची माहीती यावल वन विभागा जळगाव चे उपवनसंरक्षक जमीर मुनीर शेख यांनी दिली आहे.

Protected Content