Home Cities जळगाव जळगावात अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन

जळगावात अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते जळगाव येथील महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक विकासासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी हे कार्यालय कार्यरत राहणार आहे.

यावेळी ललित गांधी यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देत, अल्पसंख्याक समाजातील उद्योजक व व्यवसायिकांसाठी हे कार्यालय मदतगार ठरेल, असे सांगितले. तसेच, लाभार्थ्यांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाला स्थानिक प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक आणि नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक प्रगतीस चालना देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.


Protected Content

Play sound