महात्मा फुले आरोग्य संकुल येथे वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन

चाळीसगाव, प्रतिनिधी । येथील महात्मा फुले आरोग्य संकुलात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर येथे वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उदघाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आ. मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या वैद्यकीय सहाय्यता कक्षात रुग्णांना दाखल करून घेणे, रुग्णवाहिका, लसीकरण, रक्तसाठा व सोयी सुविधांबाबत रुग्णांना माहिती दिली जाणार आहे.

त्यासाठी हिंगोणेसिम येथील रहिवासी व गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई येथे चाळीसगाव तालुक्यातील रूग्णांना मदत करणारे किशोर पाटील (संपर्क क्रमांक 9975952698 ) हे सेवा देणार आहेत. सदर वैद्यकीय सहाय्यता कक्ष उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती गटनेते संजय पाटील, माजी सभापती दिनेश बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरपालिका गटनेते संजय पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेविका विजया पवार आदींसह यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे नेते नगरसेवक आनंद खरात, बापू अहिरे, जितेंद्र वाघ, अमोल चव्हाण, बबन पवार, अमोल चौधरी, रोहन सूर्यवंशी, चेतन पाटील आदी उपस्थित होते.

आपण बिनधास्त राहिलो म्हणून दुसऱ्या लाटेचा मनस्ताप सहन करावा लागला, तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण आतापासूनच सज्ज होऊया. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असण्याची शक्यता लक्षात घेता चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटर येथे लहान मुलांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्याचा दृष्टीने वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून त्यासाठी आवश्यक साधनसामग्री माझ्या आमदार निधीतून उपलब्ध करून देणार असल्याची माहिती यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

Protected Content