अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेस उद्घाटन कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या हस्ते १६ रोजी हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. जळगाव येथील जैन हिल्सवर आयोजित या कार्यक्रमात मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी सदर उपक्रमाचे महत्व विशद केले. त्यानंतर मंगळग्रह मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी यांनी रथाचे विधिवत पूजन केले.यावेळी अशोकभाऊ जैन यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात जैन उद्योग समूह या स्तुत्य उपक्रमाच्या सोबत राहील असे आश्वाशीत केले.
या रथयात्रेद्वारे अमळनेर तालुक्यातील १५४ गावांना भेट देऊन तेथील शेतकऱ्यांची जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जैन उद्योग समूहाचे मीडिया व्हॉइस प्रेसिडेंट अनिल जोशी, जनसंपर्क अधिकारी किशोर कुलकर्णी, गिरीष कुळकर्णी, ज्ञानेश्वर सोन्ने, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, अभियंता संजय पाटील, जी. एस. चौधरी, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, आर. टी. पाटील, एम. जी. पाटील, ए. डी. भदाणे, सुनील गोसावी, निलेश महाजन, रवींद्र बोरसे, विशाल शर्मा, आशिष चौधरी, जे. व्ही. बाविस्कर आदी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त व सेवेकरी परिश्रम घेत आहेत. यावेळी अशोक जैन म्हणाले की, अमळनेर येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेच्या माध्यमातून धार्मिकच नव्हे तर सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून मंगळ कृषी जनजागृती रथाचे आज उद्घाटन करण्यात आले. या माध्यमातून गावागावात हा रथ जाऊन शेतकऱ्यांना माहिती देऊन जनजागृती करणार आहे. या उपक्रमास कृषी विभागाचेही सहकार्य असून पुढील वर्षापासून जैन उद्योग समूह देखील या उपक्रमात सहभागी होणार आहे.