रस्ता आडवून सलून दुकानदाराला फायटरने मारहाण करून सोन्याची चैन व रोकड लांबविली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कासली भागातील राहणाऱ्या सलून दुकानदाराला काहीही कारण नसतांना रस्ता आडवून फायटरने मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन आणि खिश्यातील ५ हजार ६०० रूपयांची रोकड जबरी काढून घेवून दुचाकीचे नुकसान केल्याची घटना सोमवार १ जुलै रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी ३ जुलै रोजी पहाटे ३ वाजता अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनोज बबन ठाकरे वय २७ रा. झामी चौक, अमळनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सलून दुकान चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार १ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मनोज ठाकरे हा तरूण दुचाकीने घरी जात असतांना शहरातील कासली भागात काही जणांनी त्यांचा रस्ता आडविला. काहीही कारण नसतांना त्याला शिवीगाळ करत फायटर व काठीने बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि खिश्यातील ५ हजार ६०० रूपयांची रोकड असा ऐवज जबरी काढून नेला. याप्रकरणी मनोज ठाकरे याने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार मंगळवारी २ जुलै रोजी पहाटे ३ वाजता वसीम खान, कालीम उर्फ कालू रिक्षावाला, बाबा शहा, तन्वीर शहा, एजाज पठाण, अस्लम पठाण यांच्यसह इतर १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.

Protected Content