यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव खुर्द येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत एकता महिला ग्रामसंघ कार्यालायाचे उद्घाटनाचे कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले.
किनगाव येथे या ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालयाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आर.जी.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील ,किनगाव खुर्दचे सरपंच भूषण पाटील, माजी सरपंच टिकाराम मुरलीधर चौधरी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रा.प.सदस्य आनंदा महाजन, संजय पाटील, जिल्हा सचिव आणि वर्धिनी नीता साठे, एकता महिला ग्रामसंघाचे वर्धिनी शर्मिला जोगी, प्रमिला जोगी लता सावकारे, सी.आर.पी नलू सावकारे, मीना तडवी, पशु सखी सीमा पाटील, कृषी सखी संजीवनी तायडे, बँक सखी वैशाली पाटील, एफ. एल सखी ज्योती तायडे, सी.टी.सी.योगीता पाटील यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी महेंद्र सोनवणे व उदय कोळी यांनी बचत गटाचे महत्व सांगून त्याची बचत गटाच्या माध्यमातून आपली वृद्धी कशी करावी. याबाबत माहीती देत मार्गदर्शन केले. प्रसंगी उमाकांत पाटील व आर.जी.पाटील यांनीही बचत गटाचे महत्त्व सांगून कोणतीही अडचण आल्यास ती सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बचत गटाचे मीना पाटील, मंगला पाटील, छाया पाटील, माधुरी पाटील, हनिफा तडवी, संगीता पाटील, सुगाराबी तडवी, सुरेश सोनवणे, शांताराम कोळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन शर्मिला जोगी यांनी केले. कार्यालयासाठी किनगाव खुर्द व किनगाव बु.ग्रा.प.ने जागा उपलब्ध करून देऊन सहकार्य केल्याने कार्यकारी मंडळाचे आभार मानले.