नशिराबादला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यलयाचे उद्घाटन

नशिराबाद, ता. जळगाव प्रतिनिधी | येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी मध्यवर्ती कार्यालयाचे आज उद्घाटन करण्यात आले.

नशिराबाद येथील आठवडे बाजारामधील विकास सोसायटी कॉम्प्लेक्स मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव ग्रामीण मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन आज पार पडले. पक्षाचे नेते माजी आ. जयप्रकाश बाविस्कर,  जिल्हा सचिव जमील देशपांडे, मनवीसे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे, तालुकाध्यक्ष मुकुंदा रोटे, आशिष सपकाळे, रज्जक सय्यद, किरण तळेले आदींच्या उपस्थितीत कार्यालयाचे उदघाटन झाले.

याप्रसंगी जयप्रकाश बाविस्कर आणि जमील देशपांडे यांनी आगामी निवडणुकांसाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन केले. यावेळेस जळगाव ग्रामीण मधील युवकांनी मनसेत प्रवेश केला, तर नशिराबाद नगर पंचायत मध्ये पहिला नगराध्यक्ष हा मनसेचा व्हावा हा संकल्प करण्यात आला. तर नगर पंचायतीच्या निवडणुकी मध्ये  महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व च्या सर्व जागा लढणार व पहिला नगराध्यक्ष हा मनसेचा होणार असल्याची ग्वाही देण्यात आली.

या वेळी  दत्तात्रय सोनटक्के,हेमंत कोळी,समाधान पाटील ,अनिल कोळी,उमेश धनगर,दीपक निकम, गोकुळ धनगर,नरेंद्र पाटील,दत्तू पाटील,गोलू पाटील,अतुल पाटील,आकाश भिल,बापू पाटील,रवी जिरे,गजानन माळी, समाधान कोळी,संजय कोळी,लक्षीमन तायडे आदींनी मनसेच प्रवेश केला. त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले. सूत्र संचालन श्री मुकुंदा रोटे यांनी केले तर आभार अमोल माळी यांनी मानले.

या प्रसंगी  संदीप महाले,योगेश पाटील,पंकज चौधरी,बबलू कदम,रमेश पाटील,दिलप सोनवणे,रामकृष्ण माळी तसेच कार्यक्रमाच्या यशस्विते साठी  अमोल माळी, गजानन माळी, अजय माळी, तुषार पाटील,जितेंद्र बर्‍हाटे,सचिन भालेराव,लक्ष्मण तायडे,गणेश कोळी,प्रवीण रोकडे,भागवत बोन्डे, चेतन पाटील,तेजस कोळी,किरण पाटील,अरुण भोई,योगेश कोलते,सचिन कोलते,समाधान केदार,संजय कोळी,अमोल माळी, योगेश राजपूत, विजय वले आदी कार्यकर्ते उस्थित होते.

 

Protected Content