
जळगाव (प्रतिनिधी) येथील ईंडीयन रेड क्रॉस सोसायटीत जीवदया आधार प्रतिष्ठानाचा शुभारंभ सोहळा व समर्पण कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी रक्तदानाच्या कार्यक्रमातून सामाजीक सेवेचे सर्मपन करुन जीवदया आधारतर्फे सामाजीक सेवेची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमासाठी निळकंठ गायकवाड, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, हरीषभाई दोशी, लिलाताई सालेचा, शेखर सोनाळकर, गनी मेनन, विनोद बियाणी यांच्यासह तमाम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
मान्यवरांनी आपआपल्या मनोगतात सामाजीक सेवेबाबत माहीती देऊन काही कानमंत्रही दिले. जे सामाजीक सेवा करत असतांना पाळावे लागतात. उज्वला वर्मा यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक अनिल शिरसाळे यांनी केले. तर आभार महेश गोर्डे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जीवदयाच्या सदस्यांनी मेहनत घेतली. तसेच डॉ. प्रसन्न रेदासनी यांचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला.