जैन पत्रकार संघटनेचे विरार येथे राष्ट्रीय अधिवेशन

aijjaचोपडा प्रतिनिधी । ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशन म्हणजेच आईजा संस्थेचे दि. २१ व २२ सप्टेंबरला विरार येथे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून या अधिवेशनात खान्देशातुन अनेक जैन पत्रकार सहभाग घेणार आहेत

ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशनचे (आईजा संस्था) प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीयाच्या नेतृत्वाखाली दि २१ व २२ सप्टेंबर रोजी आगाशी तिर्थ विरार मुंबई येथे होणार आहे. या अधिवेशनात संपूर्ण भारतातून जवळपास ७०० जैन पत्रकार सहभागी होणार आहेत. दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी आगमन आणि स्वागत तदनंतर १० वाजता बँड पथकासह दादा गुरुदेवच्या दर्शनासाठी जाणार आहेत सकाळी ११ वाजता अधिवेशनेच्या पहिल्या सत्रास सुरुवात होणार आहे. भारतातून आलेल्या सर्व जैन पत्रकाराचे परीचय, अधिवेशनात अडीअडचणी, समस्या सादरीकरण करणार आहेत. दुपारी १ ते २ वाजेपर्यंत स्नेहभोजन घेणार आहोत स्नेहभोजन नंतर दुपारी २ ;३० ते ५ वाजेपर्यंत आईजा संस्थेत सर्वंउत्कृष्ठ कार्य करणार्‍याचा सन्मान ,गौरव करण्यात येणार आहे संध्या. स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्या नंतर रात्री ८.३० वाजता संगीतमय भजनसंध्या होणार असून यात गायक म्हणून आईजाचेच प्रतिनिधी राहणार आहेत. दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत स्नात्र पूजा होईल. ११ ते १ वाजेपर्यंत ऑल इंडिया जैन जर्नालिस्ट असोसिएशन व आम्ही , जैन एकता मध्यें आईजाची भूमिका काय ? या विषयावर उद्धबोधन होणार आहे. दुपारी १ वाजता स्नेहभोजन, दुपारी २;३० वाजता संपुर्ण भारतातून जैन पत्रकारांमधून जैन धर्मात अनमोल कार्य करणार्‍या मान्यवरांना सन्मानीत करण्यात येईल. दुपारी ४ वाजता फराळ झाल्यानंतर संध्याकाळी ५ वाजता अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

या दोन दिवसीय अधिवेशनात खान्देशातुन अनेक पत्रकार सहभागी होणार आहे याबाबत नाव नोंदणी साठी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिलीप कावेरीया व खान्देश सद्स्य लतीश जैन (चोपडा) यांच्याशी संपर्क करावे असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीया यांनी केले आहे. जैन पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन भारतात सर्व प्रथम होत आहे आणि प्रथम अधिवेशनाला ऐतिहासिक बनवायचे आहे या अधिवेशनात अनेक राज्याचे जैन पत्रकार येणार आहेत जैन पत्रकारांच्या अधिवेशना मार्फत आपण समाजासाठी काय करू शकतो ? या विषयावर विचार विनिमय होणार आहे तसेच समाजात अनेक गरीब कुटुंब आहेत त्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक हुंडीया यांनी दिली आहे.

Protected Content