विद्यापीठाच्या आंतर विभागीय क्रीडा स्पर्धांचे उदघाटन संपन्न

जळगाव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आंतर विभागीय बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि स्विमिंग या स्पर्धांचे उदघाटन प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या हस्ते करण्यात आले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा विभागाकडून आंतर विभागीय बॅडमिंटन पुरुष व महिला तसेच टेबल टेनिस पुरुष व महिला, स्विमींग पुरुष व महिला या स्पर्धांचे उदघाटन प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, जिमखाना प्रमुख डॉ. किशोर पवार उपस्थित होते.

या प्रसंगी प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन यांनी, “खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन विजयी व्हा व विद्यापीठाचे नाव उज्वल करण्यासाठी प्रयत्न करा” म्हणत शुभेच्छा दिल्या. प्र-कुलगुरु प्रा.पवार यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन नियमित सराव करावा व यश संपादन करावे असे सांगितले. प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ. दिेनेश पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. हर्षदा पाटील यांनी केले.

शुक्रवारी झालेल्या स्पर्धांमध्ये बॅडमिंटन महिला गटात धुळे विरुध्द एरंडोल सामन्यात धुळे विजयी, जळगाव विरुध्द धुळे मध्ये धुळे विजयी झाले. बॅडमिंटन पुरुष गटात जळगाव विरुध्द एरंडोल सामन्यात जळगाव विजयी, धुळे विरुध्द नंदुरबार मध्ये धुळे विजयी झाले. टेबल टेनिस महिला गटात धुळे विरुध्द जळगाव सामन्यात धुळे विजयी, पुरुष गटात धुळे विरुध्द जळगाव यामध्ये जळगाव विजयी झाले.

यावेळी प्रा.शैलेश पाटील (अमळनेर), डॉ.सजय भावसार (पारोळा), डॉ.जे.बी.सिसोदिया (बांभोरी), डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर (जळगाव), प्रा.संजय सोनवणे (चाळीसगाव), प्रा.चंद्रकांत डोंगरे (जळगाव), प्रा.सचिन पाटील (अमळनेर), प्रा.विरेंद्र जाधव (मुक्ताईनगर), डॉ. आनंद उपाध्याय (भुसावळ), डॉ.मुकेश पवार (भालोद), प्रा.क्रांती क्षीरसागर(चोपडा) हे उपस्थित होते. उद्या सर्व सामने संपणार आहेत.

Protected Content