Home आरोग्य यावल पोलिस स्टेशनमधील व्यायाम शाळेचे उद्घाटन

यावल पोलिस स्टेशनमधील व्यायाम शाळेचे उद्घाटन

0
34

यावल प्रतिनिधी । येथील पोलीस स्टेशन परिसरातील व्यायाम शाळेचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आज करण्यात आले. 

दरम्यान आज दि.३० मार्च रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे हे यावल येथे पोलीस स्टेशनच्या वार्षीक कामगीरीची तपासणीसाठी आले असता , पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या दिपक सुरक्षा भवन या ईमारतीत यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या व त्यांच्या सहकार्यांच्या प्रयत्नानी उभारण्यात आलेल्या व्यायायम शाळेचे उद्घाटन पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी फैजपुर चे विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे, पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, जेष्ठ पोलीस उपनिरिक्षक अजमल पठान यांच्यासह पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी बांधव गृहरक्षक दलाचे कर्मचारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. 

याप्रसंगी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी यावल पोलीस स्टेशनच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या व्यायायम शाळेच्या कार्याचे विशेष कौत्तुक करून, पोलीस आणी त्यांच्या कुटुंबांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे उपक्रम अतिश्य उत्तम असल्याचे त्यांनी सांगीतले.

 


Protected Content

Play sound