जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने महाबळ येथील समाज कल्याण विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने समता सप्ताहाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्याहस्ते बुधवार ६ एप्रिल रोजी सकाळी करण्यात आले.
याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी सांगितले की, समता सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुका व गाव पातळीवरील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहीती देऊन जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले. शिवाय तसेच शासन निर्णयात नमूद निर्देशानुसार जिल्हाभरात वेगवेगळ्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार असल्याबाबतची माहिती उपस्थितांना दिली.
तसेच “समता सप्ताह कार्यक्रमाच्या निमित्ताने” शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार-प्रसार कार्यालयीन तालुका समन्वयक महेंद्र पाटील, किशोर माळी, चेतन चौधरी, जितेंद्र धनगर, श्रीमती.शिला अडकमोल यांचा वतीने करण्यात येत असून तालुका व गाव पाळतीवरील लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून लाभ मिळवून देण्याबाबत प्रयत्न करावे असे निर्देश दिले आहे.