पारोळा येथे ईलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग पाईंटचे उद्घाटन

पारोळा प्रतिनिधी । शासनाच्या माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत पारोळा नगरपालिकेकडून इलेक्ट्रिक वाहनासाठी चार्जिंग पॉइंटचे उद्दघाटन करण्यात आले व वसुंधरेची शपथ घेण्यात आली.

सदर कार्यक्रम लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील व  मुख्याधिकारी ज्योती भगत पाटील यांच्या मार्गदर्शाखाली व आरोग्य सभापती नवल नामदेव चौधरी, पंकज महाजन, चंद्रकांत महाजन, एच. एम. पाटील, सुभाष थोरात, रविंद्र पाटील, आकाश चोधरी, दिनेश लोहार, मंगेश कुंभार, पांडुरंग पाटील  यांच्या  उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमात शहरातील नागरिक अरविंद नंदलाल गुरव याच्या कडील ई-व्हेईकलला चार्जिंग करण्यात आले. तसेच शहरातील ई वेहिकल धारकांनी पालिकेचे आरोग्य ऑफिस जवळील  चार्जिंग पॉइंटचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरपालिकेतर्फे  करण्यात आले आहे.

 

Protected Content