पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर ग्रामीण रुग्णालयात कोवीशिल्ड लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले असून आयडीबीआय बॅकेचे सेवानिवृत्त अधिकारी हेमंत जोशी यांनी पहिली लस लावून केंद्राचे उद्घाटन केले आहे.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून दवाखान्यात आधार कार्ड सोबत आणावे असेही ते म्हणाले. यावेळी पोलीस निरीक्षक राहुल खताळ, माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा, पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेंद्र वानखेडे, माजी सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, सचिन कुमावत, डॉ .काशिनाथ माळी यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते. पहिल्या दिवशी लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. २५ पुरुष व २६ महिला असे एकूण ५१ जणांनी लसीकरण करून घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.