जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकरी संघातर्फे रब्बी हंगाम भरड धान्य व ज्वारी पिकाचे खरेदी केंद्राचे शुभारंभ शेतकरी संघटना चंद्रकांत बाविस्कर तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजमल भागवत, उपसभापती वासुदेव घोंगडे, शेतकरी संघ व्हाईस चेअरमन बाबुराव गवळी, रवींद्र भाईदास चव्हाण, सचिव प्रसाद पाटील, पुरवठा अधिकारी विवेक वैराळकर, गोडाऊन कीपर अशोक सोनवणे, शेतकरी संघ संचालक डॉक्टर सुरेश पाटील, नाना पाटील, रंगनाथ पाटील, भिका जाधव, साहेबराव देशमुख, किशोर पवार, शेतकरी संघ सचिव गोपाल पाटील, संदीप शिंदे, अतुल पाटील, शेतकरी शशिकांत पाटील यांच्यासह शेतकरी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकरी संघामध्ये रब्बी ज्वारी विक्रीसाठी एकूण 379 शेतकऱ्यांनी ऑनलाइन केले असून शेतकऱ्यांना शासनातर्फे ज्वारीला 3180 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळणार आहे मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांची सतरा हजार क्विंटल ज्वारी आवक असून शासनाकडून फक्त 2244 क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट वाढवण्यात यावे अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून केले जाणार असून शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी केली जाणार असल्याचे प्रतिक्रिया शेतकरी संघ चेअरमन चंद्रकांत बाविस्कर यांनी शुभारंभ प्रसंगी केली आहे