जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या ‘अंतरंग २के२४’ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. संस्थाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते महोत्सवाच्या लोगोचे अनावरण आणि मशालीच्या ज्योतप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
उद्घाटनप्रसंगी उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, हृदय रोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, शल्यचिकित्सक डॉ. अनिकेत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरूड, गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. विशाखा गणवीर, डॉ. केतकी पाटील स्कूल ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. शिवा बिरादर, उप-प्राचार्या जसनीत दाया आणि प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे यांचीही विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात खेळाडूंच्या भव्य मार्चपास्टने झाली, ज्यामध्ये उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांचा परिचय घेतला. संप्तरंगी फुगे आकाशात सोडून वातावरणात उत्साह निर्माण झाला. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ झाला आणि क्रीडा महोत्सवाची अधिकृत सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे वेळापत्रक:दि. २८ डिसेंबर: उद्घाटन व प्रारंभ दि. २९ डिसेंबर: चॅम्पियन्स लीग व विविध क्रीडा स्पर्धा दि. ३० डिसेंबर: फूड कार्निव्हल दि. ३१ डिसेंबर: डीजे नाईटदि. १ जानेवारी: न्यू ईयर नाईटदि. २ जानेवारी: फ्रेशर्स पार्टी व सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्नेहसंमेलनाचा समारोपउत्सवाचे आयोजन व सहकार्य:‘अभ्युदय’ बॅचच्या विद्यार्थ्यांनी उत्सवाचे आयोजन केले आहे. आयोजनासाठी प्रा. मनोरमा कश्यप, प्रा. प्रशिक चव्हाण, प्रा. प्रियंका गवई, प्रा. दिवाना पवार, प्रा. गिरीश खडसे प्रा. श्वेता लांडगे यांच्यासह विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.उत्सवाचा उद्देश:‘अंतरंग २के२४’ चा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, खेळगुण आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणे आहे. या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन जोम आणि आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास प्राचार्या प्रा. विशाखा गणवीर यांनी व्यक्त केला.