पालकमंत्र्यांच्या हस्ते पिंपळेसीम येथे विकासकामांचे लोकार्पण व भूमिपुजन

 

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळेसीम येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमीपुजन करण्यात आले.

पिंपळेसीम येथे३ कोटी ४६ निधीतून नाबार्ड अंतर्गत बांधण्यात आलेल्या पुलाचे लोकार्पण,डीपीडीसी अंतर्गत १ कोटी २७ लक्ष निधीतून बांधण्यात आलेल्या आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण, ८१ लाखाची पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, पिंपळेसीम ते हनुमंतखेडा या रस्त्याचे १.५ किमी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ८० लक्ष निधी मंजूर असून त्या रस्त्याचा शुभारंभ देखील करण्यात आला. जन सुविधा योजनेतर्गत २२ लक्ष निधी खर्च करून बांधलेल्या ग्रामपंचायत कार्यालायचे लोकार्पण व मुलभूत सुविधे योजनेतर्गत (२५१५) मधून २० लक्ष निधीतून कॉक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉकबसविणे १८ लक्ष, ,गाव हाल बांधकाम , २ लक्ष, अश्या एकूण ६ कोटी ९६ लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे विधिवत पूजन करून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख मनोज हिरवे, अडव्होकेट विनोद पाटील, तालुका प्रमुख डी.ओ. पाटील, गजानन पाटील, दुध संघाचे संचालक रोहित निकम, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, गोविंदा मोरे, उपसरपंच अरुण पाटील, ग्रा.पं. सदस्य सोपान पाटील, अमोल पाटील, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, ज्ञानेश्वर पाटील, भगवानआबा पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, मंगलअण्णा पाटील यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील सरपंच व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आयोजक एडवोकेट विनोद पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावात केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडला व भविष्यात पिंपळेसिम व हनुमंतखेडा गावासाठी मोठा के.टी.वेअर बांधकाम (बंधारा) मंजूर करून गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक,ओपन जिम तसेच स्ट्रीट लाईटची मागणी केली. व बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षक राधेश्याम पाटील यांनी केले तर आभार उपसरपंच अरुण पाटील यांनी मानले.

याप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असून विकास कामे करताना आपण कोणताही भेदभाव केला नाही. भविष्यात पिंपळेसिम व हनुमंतखेडा गावासाठी मोठा के.टी.वेअर बांधकाम (बंधारा) मंजूर करणार असून वाघळू बुद्रुक व खुर्द या दोन्ही गावांना जोडणारा पुलाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. झुरखेडा – खपाट – पिंपळेसिम हा १० कोटीचा रस्ता तसेच पिंपळेसिम ते बोरखेडा हा ५ कोटी रस्त्याचे काम लवकर सुरू होणार आहे . पाणीपुरवठा योजनेचे काम मुदतीत पूर्ण करून ग्रामपंचायत व अधिकार्‍यांनी गावाची तहान भागवा. आपण नेहमी निवडणुकीच्या चिंतेपेक्षा विकास कामांना प्राधान्य दिले आहे . घोडा मैदान जवळ येवू द्या – विरोधकांना सभांमधून निरुत्तर करणार असून पिंपळे सिम वास यांनी आज पर्यंत दिलेले प्रेम कधीही विसरणार नाही असे भावनिक प्रतिपादन शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. यावेळी पाणीपुरवठा योजनेच्या विहीसाठी अजय रामदास जाखेटे यांनी २ गुंठ्ठे जागा मोफत दिल्याने त्यांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान, यावेळी तालुका प्रमुख डी.ओ.पाटील गजानन पाटील, धानोरा सरपंच भगवान महाजन, सरपंच संघटनेचे सचिन पवार , मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, पी.एम. पाटील सर व जि.प. सदस्य गोपाल चौधरी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जाती – पातीच्या राजकारणापेक्षा विकास कामांना महत्व देऊन मतदार संघाचा कायापालट केला. त्यांच्या कार्य कर्तुत्वामुळे ते राज्यभर प्रसिद्ध असल्याने त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे नमूद केले.

Protected Content