मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पंचायत समिती मुक्ताईनगर येथील गटशिक्षणाधिकारी मदनजी मोरे यांनी जि.प.प्राथमीक शाळा घोडसगाव पुनर्वसन येथे आकस्मिक भेट दिली. यावेळी सर्व शिक्षक आपापल्या वर्गात सेतू अभ्यासक्रमाचे अध्यापन करत होते.
प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी केली. शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी हितगुज केले. त्यानंतर शालेय पोषण आहार अंतर्गत शिजवल्या जाणाऱ्या पाककृतीची व स्वयंपाक खोलीची स्वच्छता,भाजीपाला,भोजनाचे ताटे, बस्तर पट्ट्या, आहार शिजवण्याची भांडी, मसाल्याचे पदार्थ,तांदूळ व इतर अन्नधान्य साठवणूक, या सर्वांची प्रत्यक्ष पाहणी केली. शा.पो. आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. शालेय पोषण आहार शिजवण्यापासून तर विद्यार्थ्यांना वाटप होईपर्यंत उपस्थित राहून प्रत्यक्ष निरीक्षण केले. एवढेच नव्हे तर शेवटी विद्यार्थ्यांसोबत वदनी कवळ घेता … ही प्रार्थना म्हणत रांगेत बसून स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
स्वच्छ व सुंदर शालेय परिसर, सजवलेले वर्ग, शिक्षक व विद्यार्थ्यांची उपस्थिती, स्वच्छ स्वयंपाक गृह, मुला मुलींचे स्वच्छतागृह या सर्वांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.आणि शाळेतील शिक्षकांचे कौतुक करून शाळेला राज्यस्तरापर्यंत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक अनिल पवार, शिक्षक भिका जावरे, सोमनाथ गोंडगिरे, गोपाल दुतोंडे व स्वाती भंगाळे उपस्थित होते..