लंडन-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय वंशाच्या खासदार शिवानी राजा यांनी बुधवारी ब्रिटीश संसदेत श्रीमद भगवत गीतेवर हात ठेवून खासदार म्हणून शपथ घेतली. ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून त्यांनी लीसेस्टर पूर्व मतदारसंघात विजय मिळवला. शिवानी यांनी लंडनचे माजी उपमहापौर राजेश अग्रवाल यांचा 4 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे.
लेस्टर पूर्व हा लेबर पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. शिवानी यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला 37 वर्षांनंतर येथे विजय मिळवून दिला आहे. शपथ घेतल्यानंतर शिवानी यांनी भगवत गीतेसोबत शपथ घेणे हा आपल्यासाठी सन्मान असल्याची पोस्ट केली होती. याचा त्यांना अभिमान आहे.शिवानी ब्रिटनच्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहेत. त्या सध्या 27 वर्षांच्या आहेत. शिवानी यांचे आई-वडील 1970 च्या दशकात गुजरातमधून लंडनला आले. त्या स्वतःला हिंदू मानतात आणि हिंदू प्रथादेखील पाळतात.