वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन मुलींसह जावयाचा अपघाती मृत्यू

मालेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन मुलींसह जावयाचा उभ्या कंटेनरला कार आदळून झालेल्या अपघातात दुःखद मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यालगत घडली आहे. मीनाक्षी अरुण हिरे, अनिशा विकास सावंत व विकास चिंतामण सावंत अशी या मृतांची नावे आहेत. वैभवी प्रवीण जाधव ही तरुणी या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर नाशिक स्थित रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार वृत्त असे की, मीनाक्षी व अनिशा या दोघी बहिणी होत्या. त्यांच्या वडिलांचे मुंबईत निधन झाले होते. अंत्यविधीसाठी त्यांचा मृतदेह एका शववाहिकेतून निमगाव येथे आणण्यात येत होता. शववाहिकेबरोबर जावई विकास सावंत हे स्वत:च्या वाहनाने येत होते. या वाहनात त्यांची पत्नी अनिशा, मेहुणी मीनाक्षी व नाशिक येथील दुसऱ्या मेहुणीची मुलगी वैभवी असे चौघे होते. गुरुवारी पहाटे 5 च्या सुमारास त्यांची कार वाके फाट्यालगत कंटेनरला धडकले. त्यात विकास, अनिशा व मीनाक्षीचा जागीच मृत्यू झाला.

Protected Content