अमळनेरात राष्ट्रीय रक्तदान दिवस उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी । व्यावसायिक रक्तदाते व बदली रक्‍तदाता हि संकल्‍पना कालबाह्य करुन स्‍वैच्छिक रक्‍तदानाची चळवळ समाजात निर्माण व्हावी या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी रक्तदान करून अमळनेरच्या युवा मित्र परिवार व रक्तदाते ग्रुपतर्फे राष्ट्रीय रक्तदान दिवस साजरा करण्यात आला.

निरोगी व तंदुरुस्‍त असताना देखील  जे लोक रक्‍तदान करत नाहीत त्‍यांना रक्‍तदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रेरणा देणे या उद्देशाने राष्‍ट्रीय स्‍वैच्छिक रक्‍तदान दिवस साजरा करण्‍यात आला.रक्तदाते ग्रुप चे प्रवर्तक मनोज शिंगाणे व युवा मित्र परिवारा,सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अमळनेर मध्ये ८०० रुग्णांना विविध गटातील रक्त उपलब्ध करून देत अमळनेरमध्ये रक्तदान चळवळ सातत्याने राबविण्यात येत आहे.’अनेक शहरांमध्ये प्रोफेशनल डोनर आणि बदली रक्तदाते हि रक्तदानाची पद्धत कालबाह्य करण्याच्या उद्देशाने उत्स्फूर्तपणे रक्तदान करणारे पुढे यावेत म्हणून स्वेच्छेने रक्तदान करून चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न आहे’ असे यावेळी सामजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी सांगितले.

जीवनश्री रक्तपेढी येथे तुटवडा असलेल्या रक्तगटातील रक्त उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने रणजित शिंदे, तेजा माळी, विशाल चौधरी, तुषार सोनार,सामाजिक कार्यकर्ते नाविद शेख आदिंमार्फत स्वेच्छेने रक्तदान करण्यात आले. यावेळी अमळनेर युवा मित्र परिवार व रक्तदाते ग्रुपचे राहुल पाटील, निखील चौहान, दिनेश तेवर  राहुल कंजर,विकी चौधरी, तुषार पाटील तसेच जीवनश्री रक्तपेढी चे संचालक संतोष पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर पत्रकार प्रा. जयश्री साळुंखे यावेळी उपस्थित होत्या.

 

Protected Content