शहिद जवानांच्या स्मरणार्थ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील लोणजे तांडा येथे पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने बाहेरगावाहून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.

तालुक्यातील लोणजे गावात पुलवामा हल्ल्यामध्ये शहिद  झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते. यात अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रथम पाच विजेत्यांना सन्मानपत्र आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन मोरसिंग भाई मित्र मंडळ तर्फे करण्यात आले होते. प्रथम विजेता दिनकर सत्तू मिलके (गणेश, नाशिक) यांना भारतीय बहुजन क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी पाच हजार रुपयांचे बक्षीस प्रदान केले. द्वितीय विजेता कुलदीप जुगराज चव्हाण (संभाजी नगर, औरंगाबाद) यांना लोणजे गावाचे सरपंच जिजाबाई ताराचंद जाधव यांनी तीन हजार रुपयांचे बक्षीस दिले. 

तर लोणजे गावाचे ग्रामसेवक अनंत मुळे यांनी तृतीय पारितोषिक विजेता विशाल विकास चव्हाण (रा. राजदेहरे ) याला दोन हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ग्रामपंचायत सदस्य बळीराम चव्हाण यांनी चतुर्थ पारितोषिक विजेता रामेश्वर विजय मुंजाळ (रा. संभाजीनगर, औरंगाबाद), याला पंधराशे रुपये बक्षीस देण्यात आले. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या व पहिल्या पासून पंधरा पर्यंत प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. हि स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी भारतीय बहुजन क्रांती दल शाखा अध्यक्ष सुनिल राठोड, प्रकाश पवार, सुनिल पवार, सुभाष पवार, सोमनाथ चव्हाण, राम चव्हाण, सलिम फकीर, सोमनाथ पवार, रिंक्या पवार आदींनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन जाधव यांनी केले.

 

Protected Content