अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील दुर्गानगर भागात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने होते.तर ग्रामपंचायत सदस्य गणेश चौधरी, दिनकर चव्हाण,मुरलीधर चौधरी, अशोक चौधरी, अरुण चौधरी, हिरालाल सैंदाणे, विकास पाटील, बाबूलाल पाटील, रविंद्र महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक जयेश खलाने यांनी प्रतिमा पूजन केले.यानंतर गावात सवादय मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वितेसाठी संजय चौधरी,साहेबराव चौधरी, सुरेश महाजन, मनोज माळी, दीपक चौधरी, हेमंत चौधरी, सुनील बावीस्कर, टोमेश्वर चौधरी, मयूर चौधरी, विकास चौधरी, विकास पाटील, वसंत महाजन, योगेश पाटील, सचिन चौधरी, घनश्याम वैराळे, नाना महाजन, निलेश चौधरी, प्रा.हिरालाल पाटील आदी समाज बांधवांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. संजय महाजन यांनी केले.