यावल (प्रतिनिधी)। येथील शहरातील विस्तारीत वस्तीमध्ये गेल्या काही दिवसापासुन बकऱ्या चोरांनी धुमाकुळ घातला असुन, अनेक लोकांच्या पाळीव बकऱ्या चोरीस जात आहे मात्र तक्रार देवुन देखील काही एक उपयोग होत नसल्याने पोलीसांच्याभुमिके बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल शहरातील फालक नगर, आयशानगर, चॉद नगर, आदी परिसरातुन अज्ञात चोरटयाकडुन बकऱ्या चोरीला जात असल्याच्या तक्रारी येत असुन, या बकऱ्या चोरटयांना काही स्थानीक व्यापाऱ्याचा तर पाठींबा नाही ना असा प्रश्न नागरीकाकडुन व्यक्त येत आहे या प्रकाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी होवुन कार्यवाही व्हावी अशी मागणी होत असून यावलहून चोरलेल्या बकऱ्याची विक्री बुधवारच्या फैजपुर येथील आठवडे बाजारास किंवा जामनेरच्या बाजारात चोरटे विक्रीस घेवुन जात असल्याचे वृत आहे, सतत होत असलेल्या पशुधनाच्या चोऱ्यामुळे नागरीका मध्ये कमालीची भिती व्यक्त होत आहे.