अमळनेर (प्रतिनिधी) येथील अ.शि.प्र.मंडळ संचलित साने गुरुजी नुतन माध्यमिक विद्यालयातील दहा विद्यार्थी एनएमएमएसई परीक्षेच्या गुणवत्ता यादीत आले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
राष्ट्रीय परीक्षा परीषद ,नवी दिल्ली(NCERT)यांच्या मार्फत राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालकांचे वार्षीक उत्पन्न 1,50,000 रू. पर्यंत आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्तीपरीक्षा घेतली जाते. या परीक्षेत एकूण 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. परीक्षेतील प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्याला 9 वी ते 12 वी पर्यंत दरमहा एक हजार रुपये म्हणजे चार वर्षात 48 हजार रूपये मिळतील. गुणवंत विद्यार्थ्यांना डी.के.पाटील सर व डी.ए.धनगर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक मा.आमदार बापूसाहेब गुलाबराव वामनराव पाटील, अध्यक्ष हेमकांत अनंतराव पाटील, सचिव संदीप बाबुराव घोरपडे ,सर्व संचालक वृंद मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.