आनंद तेलतुंबडे यांच्या मुक्ततेचे आदेश

पुणे प्रतिनिधी । आज पहाटे डॉ. आनंद तेलतुंबडे यांची करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असल्याचा निर्णय आज पुणे न्यायालयाने दिल्याने पोलीसांना धक्का बसला आहे.

याबाबत वृत्तांत असा की, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून आज पहाटे साडेतीन वाजता मुंबई विमानतळावरून पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दुपारी तेलतुंबडे यांना पुणे येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. येथे झालेल्या सुनावणीत तेलतुंबडे यांचे वकील अ‍ॅड. रोहन नहार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा संदर्भ देऊन ही अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला. तेलतुंबडे यांना ११ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाले असतानाही अटक कशी करण्यात आली?, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचे नमूद करून तेलतुंबडे यांची सुटका करण्याचे आदेश दिले. न्यायालयाचे हे निर्देश पोलीसांना धक्का देणारे ठरले आहेत.

Add Comment

Protected Content