जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सोन्याची पोत दुरुस्तीसाठी आलेली महिला शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने ब्लेडने बॅग कापून पर्ससह १ लाख रूपये किंमतीची सोन्याची पोत लांबविली. तर दुसऱ्या घटनेत महिलेच्या पिशवीत असलेली ३० हजाराची रोकड लांबवल्याच्या दोन्ही घटना शनिवार १३ एप्रिल रोजी फुले मार्केटमध्ये सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घडल्या. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात वास्तव्यास असलेल्या महिलेची सोन्याची पोत तुटल्याने ती दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी पोत सराफाकडे नेण्यासाठी महिलेने एका लहान पर्समध्ये ठेवली. त्यानंतर ही पर्स एका बॅगमध्ये घेत मुलगा तसेच एका तरुणीला सोबत घेत दुपारी टॉवर चौकात आले. सुरुवातीला त्यांनी फुले मार्केटमध्ये खरेदीसाठी गेल्या. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत भामट्याने ब्लेडने पाडत सोन्याची पोत असलेली पर्स लंपास केली. हा प्रकार लक्षात येताच महिलेने लागलीच शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेची ३० हजारांची रोकड लांबवली.
दुसऱ्या घटनेत महिला चणे, फुटाणे विक्री करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. माल विक्री झाल्याने नवा माल घेण्यासाठी महिलेने घरातील रोकड व माल विकलेले पैसे असे एकुण ३० हजाराची रोकड पिशवीत भरुन टॉवर चौकात आली. ही महिला पायी चालत जात असताना भामट्याने त्यांच्या पिशवीतील ३० हजाराची रोकड अलगद काढून घेत पसार झाला. याबाबत रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.