नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सरसकट 10 टक्के कराची शिफारस कर संरचनेचा आढावा घेणाऱ्या समितीकडून करण्यात आली आहे. नव्या अर्थसंकल्पामध्ये या शिफारसींचा विचार केला तर ही मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकरामध्ये सुट देण्याचा प्रस्ताव आहेच, त्याशिवाय लोकांच्या खिशावरील भार कमी व्हावा, यासाठी समिती एका विशेष स्कीमवर विचारमंथन करत आहे. त्यानुसार 20 लाख ते 2 कोटी दरम्यान वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी 30 टक्के, वार्षिक उत्पन्न 2 कोटींहून अधिक असणाऱ्या करदात्यांसाठी 35 टक्के कर असावा, अशी शिफारस समितीकडून करण्यात आली आहे. तर नव्या वर्षात मोदी सरकार एखादी नवी योजना सुरु करण्याची शक्यता आहे. त्या योजनेबाबतही समितीकडून चाचपणी सुरु आहे.