मिस्टर ओवेसी, आता तरी रडणे थांबवा- शिवसेनेचा खोचक सल्ला !

मुंबई प्रतिनिधी । ओवेसी काय म्हणतात ते ढोंगच आहे. जे पाप तोफांनी उभे केले ते शिवसेनेच्या हातोड्यांनी उध्वस्त झाल्याचे सांगत मिस्टर ओवेसी आता तरी रडणे थांबवा असा खोचक सल्ला आज शिवसेनेने दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये ओवेसी यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, अयोध्येत भव्यदिव्य राममंदिर उभारणीच्या कार्यास प्रारंभ झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी रामदर्शन घेतले व साष्टांग असे दंडवत घातले. संकटाच्या चक्रव्यूहातून रामजन्मभूमी मुक्त झाली असे पंतप्रधान म्हणाले. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी अयोध्येतील सोहळ्याचे स्वागत केले आहे, पण काही विघ्नसंतोषी राजकारण्यांच्या पोटदुखीस अंत नाही. अर्थात यात नेहमीप्रमाणे असदुद्दीन ओवेसी हेच आघाडीवर आहेत. बाबर हा हिंदुस्थानात घुसलेला आक्रमक होता. हिंदुस्थानातील मोगल साम्राज्याचा संस्थापक बाबर होता. त्याने आपले आत्मचरित्र लिहिले आहे. त्यात ङ्गहिंदूफ व ङ्गहिंदुस्थानफ या शब्दांचा त्याने वापर केला आहे. मोगलांच्या आक्रमणात हिंदूंचे स्वामित्व काही काळ लयास गेले, पण म्हणून त्यांचे अस्तित्वच संपले असे होत नाही. बाबराने रामजन्मभूमीचा विध्वंस केला व तेथे मशीद उभारली हे ओवेसींसारखे नेते का स्वीकारीत नाहीत? ओवेसी हे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यांनी आणखी एका मुद्द्यावर बांग दिली आहे. ते म्हणतात, हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे राममंदिराच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहून मोदींनी संवैधानिक शपथ मोडली आहे. आजचा दिवस म्हणजे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेची हार असून हिंदुत्वाचा विजय आहे!फफ ओवेसी यांच्या बोलण्यात तथ्य नाही. ते वातावरणात गरमी आणू पाहत आहेत, पण आता ते शक्य नाही. मुळात स्वतः ओवेसी तरी खरे निधर्मी आहेत काय याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, ओवेसी म्हणतात, मोदी यांनी अयोध्येत केलेले मंदिराचे भूमिपूजन असंवैधानिक आहे. श्रीमान ओवेसी, कोणत्या संविधानाच्या गोष्टी आपण करीत आहात? देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराबाबत निर्णय दिला. म्हणजे संविधानाचा आदर ठेवूनच अयोध्येत पंतप्रधानांनी भूमिपूजन केले आहे. हिंदुत्व हे सगळ्यात जास्त निधर्मी आहे. कारण ते देशाचे संविधान व न्यायालयाचा आदर करते. असदुद्दीन ओवेसी म्हणतात, ङ्गङ्घअयोध्येत पंतप्रधान मोदी भावनिक झाले. मिस्टर पंतप्रधान, मीसुद्धा तितकाच भावनिक झालो आहे. कारण मी एकात्मतेवर विश्‍वास ठेवतो. मी भावनिक झालो, कारण त्या ठिकाणी ४५० वर्षे एक मशीद उभी होती.फफ ओवेसी काय म्हणतात ते ढोंगच आहे. कारण पाच हजार वर्षांपासून तेथे एक राममंदिर होते. ते तोफा लावून पाडले गेले व तेथे मशीद उभी केली गेली! त्यामुळे नक्की कोणी भावनिक व्हायचे? जे पाप तोफांनी उभे केले ते पाप शिवसैनिकांनी हातोड्यांनी उद्ध्वस्त केले. लोकभावनेचा हा विजयच आहे! मिस्टर ओवेसी, आता रडणे वगैरे बंद करा असा सल्ला यात देण्यात आला आहे.

Protected Content