जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव अंतर्गत, जळगांव विभाग आंतर महाविद्यालयीन कबड्डी (पुरुष व महिला) स्पर्धा २०२२ दिनांक १४ व १५ ऑक्टोबर २०२२ रोजी अॅड. एस.ए. बाहेती महाविद्यालय जळगांव येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत जळगांव विभागातील महाविद्यालयांचे एकूण १६ पुरुष संघ व ०९ महिला संघांनी सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत मू. जे. महाविद्यालयातर्फे पुरुष संघात पवन सपकाळे, विशाल तायडे, गणेश कोळी, राकेश सोनवणे, ईश्वर जोशी, देवेश चौधरी, प्रज्वल सोनवणे, पवन कुमार माळी, गौरव गंगारे, अक्षय सोनवणे, कुणाल तायडे, व हेमराज कोळी यांचा समावेश होता तर महिला संघात गायत्री सपकाळे, तेजस्विनी परदेशी, गायत्री गुरव, प्रतीक्षा इंगळे, वैशाली कोळी, श्रद्धा सपकाळे, प्रांजली देसले, गीता पाटील, हर्षदा सोनगिरे, दिव्या मोरे, रिंकू साईनी व शिवानी महाले यांचा सहभाग होता.
सदर स्पर्धा ह्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे व अटींचे आधीन राहून आयोजित केल्या गेल्या. विभागीय स्पर्धेकरिता मू. जे. संघातून गौरव गंगारे, अक्षय सोनवणे, राकेश सोनवणे, हेमराज कोळी व विशाल तायडे यांची निवड झाली तसेच महिला संघाकरिता गायत्री सपकाळे, तेजस्विनी परदेशी व श्रद्धा सपकाळे यांची निवड झाली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे के.सी.ई. सोसायटी चे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, मू. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स.ना. भारंबे, मू. जे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व जळगांव विभाग क्रीडा समितीचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. संघाला प्रा.डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर सर व प्रा.नितीन चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.